Motivational Marathi Poems
मी हार मानणार नाही...
हरलो जरी आज मी ,
तरी हार मी मानणार नाही...
उठेन उद्या नव्याने ,
जिंकल्या शिवाय राहणार नाही...!!
थकले जरी शरीर माझे ,
मी थकनार नाही...
ती सोनेरी पहाट ,
पाहिल्या शिवाय राहणार नाही...!!
करेन खूप कष्ट मी,
कधी रडणार नाही...
लढल्या शिवाय मी ,
काही मरणार नाही...!!
रोखले जरी कोणी मला,
मी थांबणार नाही...
मला कोणी थांबवेल,
असा कोणी घडलाच नाही...!!
मेलो जरी आज मी ,
तरी मला खंत नाही...
घेईन जन्म नव्याने,
हार मी मानणार नाही...!!
Jr.patil
Comments